---Advertisement---

देवमोगरा आदर्श आश्रमशाळेत प्रवेश सुरु; ‘ही’ आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत

---Advertisement---

जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ( ता. नवापूर, जि. नंदुरबार ) येथे १०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेवू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयात १४ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.

आश्रमशाळेत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा ७ एप्रिल, १०२४ रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. जे विद्यार्थी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ४ थी च्या वर्गात शिकत असून परीक्षेला बसणार आहेत व पुढील वर्षी इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकरिता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, (जामनेर) आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद,(अमळनेर) या दोन केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले इयत्ता ४ थीत शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे. ही परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर आधारित आहे. या आश्रमशाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रूपये एक लाखांच्या आत असावे.

इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश परिक्षेचा अर्ज, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल या कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावा. असे आवाहन ही श्री.पवार यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---