पाकिस्तानात गुरुवार, 8 रोजी सार्वत्रिक मतदान होत असून, देशभरातील मतदान केंद्रांवर 6 लाखांवर सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. पोलिस, नागरी सुरक्षा बल तसेच सशस्त्र बलाचे जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था मतदान केंद्रांवर असेल. सकाळी 8 वाजलेपासून मतदान सुरू आहे. सायंकाळी 5 पर्यंत विनाअवकाश ते सुरू राहील. दरम्यान पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
पाकिस्तानमध्ये मतदान सुरू, मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित
Updated On: एप्रिल 29, 2024 11:11 am

---Advertisement---