Dhule : धुळ्यात उभे राहिले जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन

---Advertisement---

 

Dhule :  जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन   जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदिप स्वामी यांच्या हस्ते  झाले.

 

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतुन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यासाठी तात्काळ परवानगी दिल्यामुळे बालस्नेही पोलीस स्टेशन ही संकल्पना साकार करणे शक्य झाले. या उपक्रमाचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले असुन या उपक्रमांस शुभेच्छा दिल्यात.

 

या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी,बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे , बाल कल्याण समिती सदस्या  अनिता भांबेरे, सुरेखा पवार, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, परिवीक्षा अधिकारी पी.एस.कोकणी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, संरक्षण अधिकारी ( संस्थात्मक ) तृप्ती पाटील, राज्य समन्वयक नंदु जाधव, जिल्हा समन्वयक श्रीकांत मोरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या गायत्री भामरे, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील आझादनगर पोलीस स्टेशन येथे हे पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे, पोलीस स्टेशनच्या आवारात येतांना बालकांना सुरक्षित व मनोरंजक वातावरण असावे यादृष्टीने जन साहस संस्था, इंदौर शाखा, धुळे यांच्या सौजन्याने आझादनगर पोलीस स्टेशनच्या तळमजल्यातील एका कक्षातील भिती बालस्नेही चित्रांनी रंगविण्यात आल्या आहेत,  बालकांची सर्वप्रथम सुरक्षितता जोपासली जावी, बालकांचे सर्वोत्तम हित जोपासल जावं, बालकांची सहभागिता अंगिकारली जावी, बालकांप्रती संवेदनशील व्यवस्था निर्माण केल्या जाव्यात बालकांना भयमुक्त वाटेल असे वातावरण निर्माण केलं जावे तसेच बाल स्नेही प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेमध्ये रुजवणं आणि सजवण ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. हा  यामागचा उद्देश आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---