---Advertisement---
अमळनेर : पाडळसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवत १२ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी निवड कार्यक्रम निवडणूक निर्णय सहाय्यक सहकार अधिकारी सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखालील १६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. यावली प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी सुनील महाजन यांनी अध्यक्षपदी डॉ. अविनाश पाटील तर उपाध्यक्षपदी हभप लक्ष्मण पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली. बहुतांश नवनिर्वाचित संचालक मंडळात मंत्री अनिल पाटील यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने पाडळसरे विकास सोसायटीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा रोवला गेला आहे.
---Advertisement---