---Advertisement---
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट २१ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १५ जागांवर लढू शकते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ९ जागा मिळू शकतात, असे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ला २ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे, असे पुढे सुत्रांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.