---Advertisement---

ॲड. के.सी. पाडवींच्या ‘त्या’ आरोपाचे आ.आमश्या पाडवींनी केले खंडन, म्हणाले…

---Advertisement---

तळोदा : काँग्रेसचे आ.ॲड. के.सी. पाडवी यांनी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर अनेक आरोप केले असून आज पत्रकार परिषदेत या सर्व आरोपांचे आमदार पाडवी यांनी खंडन करून के.सी. पाडवी यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे, अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

उबाठाचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांनी नुकतेच शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला असून त्यानंतर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. के.सी. पाडवी यांनी एका टिव्ही चैनलला दिलेल्या मुलाखतीत आमश्या पाडवी यांच्यावर अनेक आरोप केल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत असल्याने आज अक्कलकुवा येथे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचे खंडन केले असून के सी. पाडवी यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवले नाहीत तर त्यांच्या विरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment