---Advertisement---
जळगाव : पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडून पाचोऱ्यातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोकेश महाजन (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान लोकेश महाजन या तरुणाचा रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७० / १० नजीक धावत्या रेल्वेखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून लोकेश महाजन याचा मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहे. लोकेश हा आई – वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे आई वडिलांनी घटनेची माहिती मिळताच एकच आक्रोश केला.
---Advertisement---