रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या गाडीला कन्हान परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या पीए समावेत त्यांच्या ताफ्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, यामध्ये आशिष जयस्वाल हे सुखरूप बचावले आहेत. अपघात झालेल्या गाडीमध्ये ते उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
आमदार आशिष जयस्वालांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू
Updated On: एप्रिल 29, 2024 11:00 am

---Advertisement---