---Advertisement---

Girish Mahajan : ‘उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकलीचं’, पण… नक्की काय म्हणाले ?

---Advertisement---

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये उपस्थिती दर्शवत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर आहे तेी नकली शिवसेना आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसंच नकली शिवसेनेचे लोक महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांना आणून रॅली कढाताना दिसत आहेत असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत ‘शिवसेना प्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड, भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो’ असं म्हटलं होत. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ? 
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी असून,  उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकलीच आहे. परंतु, ते जे काही शब्द बोलले हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते.  सध्या त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. कारण त्यांच्याकडे कोणी राहायला तयार नाही. आमदार, खासदार होते ते पार्टीतून बाहेर चालले आहेत. त्यामुळे मला वाटत की, कधीकधी त्याची मानसिक संतुलन बिघडत चालली आहे. म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर त्यांनी बोलावं. संजय राऊत तर बोलतातच, पण उद्धवजी असं बोलावं त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment