---Advertisement---
छत्तीसगडमधील कांकेर येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या 29 नक्षलवाद्यांपैकी 16 जणांची ओळख पटली आहे. या नक्षलवाद्यांमध्ये मोहला दलम कमांडर विनोद गावडे आणि दिवाकर गावडे अशी दोन पुरस्कृत माओवाद्यांचा समावेश आहे. दिवाकर गावडे यांच्यावर पोलिसांनी १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. शंकर राव डीव्हीसीएम उत्तर बस्तर विभाग मास प्रभारी, रजिता पती शंकर राव उत्तर बस्तर विभाग, ललिता डीव्हीसीएम परतापूर क्षेत्र समिती प्रभारी, दिवाकर गावडे मोहला दलम कमांडर, विनोद गावडे दलम कमांडर, जुगनी उर्फ मालती परतापूर क्षेत्र समिती, माधवी सुक्ल उत्तर बस्तर विभाग, एरिया कमिटी, श्रीकांत परतापूर एरिया कमिटी, रुपी मेधकी एलओएस कमांडर, रामशिला-उत्तर बस्तर विभाग. उर्वरित १३ मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.