---Advertisement---

काँग्रेस उमेदवाराच्या रॅलीत खरोखरच शाहरुख खान आला होता का ? व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

जगातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील 19 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 102 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीत शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शाहरुख स्वतः प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी रॅलीत आला होता का, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे एक्सप्रेशन आणि लूक्स हुबेहूब किंग खानसारखे होते. त्यामुळे सर्वजण संभ्रमात पडले होते, पण प्रचारसभेत काँग्रेसने शाहरुख खान म्हणजेच किंग खानसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला आणले होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment