---Advertisement---

Santosh Chaudhary : संतोष चौधरी यांचे पॅचअप; श्रीराम पाटलांना मिळवून देणार मताधिक्य

---Advertisement---

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, यावरून नाराज झालेले माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने त्यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा शांत झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे देखील नाव होते. पक्षाच्या वतीने त्यांना शब्द देण्यात आला होता असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर देखील केले होते. एवढेच नव्हे तर उमेदवारीसाठी मुलाखत देऊन आल्यावर चौधरी समर्थकांनी त्यांचे  जंगी स्वागत देखील केले होते. मात्र श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आपल्याला चार राजकीय पक्षांची ऑफर असून आपण उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा संतोष चौधरी यांनी केली होती. यानंतर ते काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत देखील सहभागी झाले नव्हते. तथापि, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी संतोष चौधरी  हे लवकरच प्रचारात सक्रीय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता.

दरम्यान, आज जामनेरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजीत मेळावा सुरू झाल्यानंतर संतोष चौधरी हे व्यासपीठावर दाखल झाले. यामुळे त्यांची बंडाची भूमिका संपल्याचे संकेत मिळाले आहेत.

त्यांनी आपल्या मनोगतातून भुसावळच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच मतदारसंघात दादागिरीचे उत्तर हे दादागिरीनेच दिले जाईल असेही त्यांनी बजावले. यामुळे आता संतोष चौधरी यांचे पॅचअप झाल्याचे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment