---Advertisement---
भुसावळ : महायुतीच्या रावेर लोकसभाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवार, ७ मे रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. विशेषतः ही सभा रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी बुस्टर डोस ठरणार आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. या सभेला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर महायुतीचे नेते व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.