---Advertisement---

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, म्हणाले, “मी जिवंत आहे, तोपर्यंत…”

---Advertisement---

नंदुरबार : महाविकास आघाडी आरक्षणाचा महाभियान चालवत आहेत. पण मोदी एससी, ओबीसी, एसटीचे आरक्षण वाचण्यासाठी महारक्षण करत आहेत, असा हल्लाबोल पीएम मोदींनी खासदार डॉ. हिना गावित यांच्या प्रचार सभेतून केला.

मी, मागच्या १७ दिवसांपासून वारंवार काँग्रेसला आव्हान करत की ‘तुम्ही लिहून द्या की एससी, ओबीसी, एसटी आरक्षणाचे तुडके करून इतररांना वाटणार नाही. पण काँग्रेस उत्तर द्यायला तयार नाही. याचा अर्थ त्यांचा हाच अजेंडा आहे, असा आरोप पीएम मोदींनी केला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, पण ते कितीही ताकत लावतील तरी मोदी होऊ देणार नाही, ही मोदींची गॅरन्टी आहे. पण जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत जनतेचा मला आशीर्वाद आहे, धर्माच्या नावावर आरक्षण देण्याचा आणि संविधानाला बदलण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीला दिला आहे.

 

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment