---Advertisement---

कॅमेरा पाहताच रोहित शर्माने हात जोडले, म्हणाला.. ; पाहा VIDEO

---Advertisement---

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा मैदानावर त्याचा जुना सहकारी अभिषेक नायरशी बोलत होता. ज्यामध्ये रोहित हार्दिकच्या मुंबई इंडियन्समध्ये आल्यानंतर झालेल्या बदलांबद्दल बोलत होता. त्यानंतर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यानंतर KRR ने व्हिडिओ डिलीट केला. आता रोहित शर्माचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याचा मित्र धवल कुलकर्णीशी बोलत होता आणि कॅमेरा त्याचे शूटिंग करत होता. रोहितने कॅमेरामनला पाहताच हात जोडून सांगितले, ‘ऑडियो बंद कर दे भाई’ ..
https://twitter.com/isha45___/status/1791486306754937087
दरम्यान, यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली होती. त्याच्या बॅटमधूनही शतक पाहायला मिळाले, पण त्यानंतर रोहितची बॅट नि:शब्द झाली. मात्र, मुंबई इंडियन्सच्या आयपीएल 2024 च्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माची बॅट जोरात बोलली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

मुंबई इंडियन्सचा पराभव झाला
या सामन्यात रोहित शर्माची बॅट चमकली, मात्र त्यानंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या. चांगली सुरुवात करूनही मुंबई संघाला केवळ 196 धावा करता आल्या. यासह मुंबईने यंदाच्या मोसमात गुणतालिकेत 10व्या स्थानावर म्हणजेच शेवटचे स्थान पटकावले आहे….

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment