---Advertisement---
जळगाव : शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारात उघडकीस आली. ललित प्रल्हाद वाणी (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नाथावाडा परिसरातील रहिवासी ललित प्रल्हाद वाणी (४५) हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री 11:45 वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथावाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृत्यूदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली.
मयत ललित वाणी यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी ललित यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे घटनास्थळी पोहोचले असून नमूने घेत आहे. मयताचा खून का केला ? कोणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहे.