पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिरूडच्या उपसरपंच आमंत्रित 

---Advertisement---

 

पाचोरा : अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथे आज ९ रोजी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

शिरूड येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांनी ग्रामविकासात जलसंधारण, मृदसंधारण, सेंद्रिय शेती यावर विशेष भर दिला आहे. याचे प्रसारण दूरदर्शन वर व रेडिओवर देशभरात करण्यात आले होते. याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमांतर्गत २५ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्याशी  कामाबाबत प्रत्यक्ष फोनवर संवाद केला होता.

दिल्ली येथे आज ९ रोजी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी होत आहे. यासाठी ८ रोजी सायंकाळी कल्याणी पाटील यांना पंतप्रधान कार्यालयातून दुरध्वनीवरून शपथविधी कार्यक्रमबाबत कळविण्यात आले. कल्याणी पाटील यांच्यासह त्यांचे पती प्रफुल्ल पंडित पाटील यांनाही सदर महत्वपूर्ण सोहळ्याला बोलवण्यात आले आहे. ते सायंकाळी दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---