---Advertisement---

MP Raksha Khadse : रक्षा खडसेंना मंत्रिपद; मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष

---Advertisement---

मुक्ताईनगर : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी घोषणा होताच मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

नरेंद्र मोदी आज रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात महाराष्ट्रातू रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळणार आहे. यासाठी खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.

रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी घोषणा होताच मुक्ताईनगरमधील परिवर्तन चौकात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. खडसे हे ब्रँड आहे अशा प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment