---Advertisement---

जळगावात मध्यरात्री बंदुकीच्या धाकावर लूटमार, अखेर आवळल्या मुसक्या

---Advertisement---

जळगाव : बंदुकीच्या धाकावर सहा संशयीतांनी दोघांना लूटमार केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे घडली. अखेर अवघ्या काही तासा एमआयडीसी पोलिसांनी चार संशयीतांना बेड्या ठोकल्या आहे.

पोलीस सूत्रानुसार, देवेंद्र श्यामराव काळे (वय 37) आणि त्यांचे मित्र मित्र शहा शाहिद शकील यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास लुटले होते. या घटनेत मोबाईल व रोख रक्कम अशा 22 हजार रुपयांची लूट करण्यात आली होती. मूळचे पुणे येथील देवेंद्र काळे सध्या कुसुंब्यामध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत चौघे संशयीत निष्पन्न केले व ते जळागावच्या सुप्रीम कॉलनीतील असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या.  

एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सतीश गर्जे, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, मुकेश पाटील, राहुल रगडे यांनी मंगळवारी रात्री सुप्रीम कॉलनीतील चौघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख व रतीलाल पवार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment