Chetan Hazare : जवान चेतन हजारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; जवानाच्या आईकडे राष्ट्रध्वज सुपूर्द

---Advertisement---

 

पाचोरा : शहरातील बीएसएफ जवान चेतन हजारे यांना मिझोराम राज्यात कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. त्यांच्यावर आज सोमवारी सकाळी येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिवाराच्या भावना अनावरण झाल्या होत्या.

वीर जवान चेतन हजारे यांचे पार्थिव सकाळी पाचोरा शहरात दाखल झाले. पाचोरा- भडगाव मतदारसंघाचे
आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पिटीसी चेअरमन संजय वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, डीवायएसी धनंजय येरूळे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह मान्यवरांनी वीर जवानाचे अंत्यदर्शन घेत पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली. वीर जवान चेतन हजारे यांना अखेरचा निरोप देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारावेळी परिसरातील लोक मोठ्या संख्येने शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, शहीद जवान चेतन हजारे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राष्ट्रध्वज जवानाच्या आईकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---