---Advertisement---
नवी दिल्ली : मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं म्हणजे सेबीने संदीप टंडन यांचं मालकीच्या क्वांट म्युच्युअल फंडाविरुद्ध फ्रंट रनिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सेबीने क्वांट म्युच्युअल फंडाच्या अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून सध्या हैदराबाद आणि मुंबई या फंड हाऊसच्या दोन ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली.
या फंडाला सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) २०१७ मध्ये परवाना दिला होता. हा देशातील सर्वात वेगानं वाढणारा म्युच्युअल फंड (Mutual Fund) आहे. रिपोर्ट्सनुसार, फंड हाऊसकडे सध्या ९०,००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २०१९ मध्ये ती १०० कोटी रुपये होती. या वर्षी जानेवारीत कंपनीची मालमत्ता ५० हजार कोटीरुपयांच्या पुढे गेली होती. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये २६ स्कीम्स आणि ५४ लाख पोर्टफोलिओंचा समावेश होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशनमधून सुमारे २० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सेबीने आपल्या सर्व्हिलन्स टीमने संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्न पकडले आहेत. यानंतर सेबीनं फंड हाऊसच्या कारभारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. या वर्षी जानेवारीत फंड हाऊसकडे २६ स्कीम्स आणि ५४ लाख फोलिओंचा पोर्टफोलिओ होता. फंड मॅनेजर किंवा कंपनीच्या अनियमिततेमुळे गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागू शकतो. तसेच या प्रकरणामुळे निधीची विश्वासार्हता कमी होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पैसे काढून घेऊ शकतात.
काय म्हटलं कंपनीनं?
“नुकतीच क्वांट म्युच्युअल फंडाला सेबीकडून एन्क्वायरी मिळाली आहे आणि आम्ही या संदर्भात आपल्या काही चिंतांचं निराकरण करू इच्छितो,” असं कंपनीनं म्हटलंय. ही एक नियमित संस्था आहे आणि कोणत्याही पुनरावलोकनादरम्यान नियामकाला सहकार्य करेल. आम्ही सेबीला आवश्यक ती सर्व मदत करत राहू आणि नियमित आणि आवश्यक डेटा पुरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. संदीप टंडन क्वांट एमएफचे संस्थापक आणि सीईओ आहेत.
---Advertisement---