---Advertisement---

दुर्दैवी ! अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; जामनेर तालुक्यातील घटना

---Advertisement---

जामनेर : तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, ४ रोजी उघडकीला आली. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धीरज नारायण पवार (१७,) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे धीरज पवार हा वास्तव्याला होता. ४ जुलै रोजी दुपारीच्या सुमार तो शेतात गेलेला असताना त्याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुभाष पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---