तुम्हीही दहावी बारावी पास असाल आणि रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने तिकीट तपासणीस(TC) पदासाठी भरती सुरु आहे. या भरतीद्वारे तब्बल ११२५५ पदे भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत अधिसूचना या महिन्याच्या अखेरपर्यंत देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
रेल्वे भरती मंडळाने याबाबत कोणतीही अधिसूचना जाहीर केलेली नाही. परंतु या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट देण्यात येईल. तसेच तिकीट तपासणीस या नोकरीसाठी तुम्हाला २५००० ते ३४,४०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
कोण अर्ज करू शकतो.
या भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतून पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.
अशी होईल निवड?
या नोकरीसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येईल. नंतर मुलाखतीचा राउंड होईल. या फेऱ्यांमध्ये पास झालेल्या उमेदवाराची या नोकरीसाठी निवड करण्यात येईल.
अर्ज शुल्क किती लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. सामान्य, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये फी घेतली जाईल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून २५० रुपये फी घेतली जाईल.