---Advertisement---

जळगावमध्ये बंध घर पाहताच चोरट्यांनी साधली संधी, संसारपयोगी वस्तू लंपास

---Advertisement---

जळगाव : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून पुन्हा एका घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटयांनी संसारपयोगी वस्तू लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रानुसार, रंजना अशोक ठाकूर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्या भुसावळ येथे वास्तव्यास असून  त्यांच्या आईचे जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथे घर आहे. मात्र, त्या चार वर्षापूर्वी मयत झाल्यामुळे सध्या त्याठिकाणी कुणीही राहत नाही. रंजना ठाकूर या अधून-मधून तेथे राहण्यासाठी येतात.

दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजता त्यांना त्यांच्या मावशी खटाबाई शिरसाठ यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या घराच्या दरवाजा आणि खिडकी तुटलेली असल्याचे सांगितले. ठाकूर यांनी लागलीच जळगाव गाठून घराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना घरातील फ्रीज, एम्लीफायर, पाण्याचे हंडे, कळशी, पातेले, फॅन, इन्व्हर्टर, बॅटरी, सिलेंडर आणि पाण्याची मोटार चोरीला गेल्याचे दिसून आले.

याप्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरटयांनी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment