---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३। ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण ड्रायफ्रूट्सचा वापर करून अनेक खाद्य पदार्थ बनवू शकतो. ड्रायफ्रूट्स पासून ड्रायफ्रूट्स हलवा सुद्धा बनवला जातो. हा घरी करून पहायला पण सोप्पा आहे. ड्रायफ्रूट्स हलवा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
पिस्ता, अक्रोड, बदाम, वेलची पूड, खजूर, साखर, पाणी, साजूक तूप.
कृती
सर्वप्रथम एका कढईत मध्यम आंचेवर एका चमचा साजूक तूप घालून गरम करा. तूप वितळल्यावर त्यात पिस्ता घालून सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. त्यात वेलचीपूड मिसळा आणि गॅस बंद करून बाजूला ठेवा. नंतर खजूर, पाणी आणि साखर घालून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करून घ्या. त्यात शिल्लक असलेले तूप मिसळून घ्या.आता तापत असलेल्या कढईत खजुराची केलेली पेस्ट घालून 5 ते 7 मिनिटे परतून घ्या ही पेस्ट घट्ट झाल्यावर गॅस मंद करून ढवळत राहा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात बदाम, पिस्ता आणि अक्रोड घालून 4 ते 5 मिनिटे शिजवा.