---Advertisement---
Bangladesh Violence : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमध्ये हिंसाचार पेटला आहे. हिंसाचारामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
---Advertisement---

एवढंच नाहीतर शेख हसीना यांनी सोमवारी देश सोडून भारताचा आश्रय घेतला. पुढे त्या लंडनाच्या आश्रयाला जातील, असं सांगितलं जातंय. दरम्यान, बांग्लादेशी जनतेने पंतप्रधान निवासात घुसून लूटालूट केली आहे.
याबाबतचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत तर मोठा जमाव हातात मिळेत ती चीजवस्तू लुटून नेत जात असल्याचे चित्र दिसत आहे.
एका व्हिडीओत खूर्ची, टेबल, सोफा, कुराण, लॅम्प, महागडे पंखे, फर्निचर, रोपटी, आरओ प्युरीफायर, टीव्ही, ट्रॉली बॅग, एवढंच काय भांडीकुंडी, पातेली लूटून घेऊन जाताना बांग्लादेशी जनता दिसत आहे.