---Advertisement---

जळगावात कामगार निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले

---Advertisement---

जळगाव । मुकादम पदावर असलेल्या तक्रारदाराला सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ५० हजारांची मागणी करून ३६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला गुरुवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. चंद्रकांत पाटील (वय ५७, रा. जळगाव) असे लाचखोर कामगार निरीक्षकाचे नाव असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सदर सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो असे सांगत तक्रारदार यांना ५० हजारांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणीसाठी गुरुवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तडजोडी अंती ३६ हजारांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---