---Advertisement---
चोपडा : बदलापूर, सिन्नर तालुक्यात अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना चोपडा तालुक्यात घडलीय. येथे एका नराधमाने १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर जबरदस्तीने अत्याचार केले. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन बालिका आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील सौरव महेंद्र पाटील याने २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडितेला दुचाकीवर बसवून मक्याच्या शेतात नेले.
दरम्यान, तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीतेने नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी पिडीतेसह चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सौरव महेंद्र पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहे.
---Advertisement---