---Advertisement---
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी स्पष्ट झाला. या निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा सोमवार, 25 रोजी शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहे. यावेळी कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे लक्ष लागले आहे. ज्याचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रिपदे मिळतील, अशी शक्यता आहे.
संभाव्य मंत्र्यांची नावे
भाजप : देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, नितेश राणे, राहूल कूल, संजय कुटे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे, मंदा म्हात्रे, देवयानी फरांदे.
एकनाथ शिंदे शिवसेना : एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, संजय शिरसाट, उदय सामंत, दीपक केसकर, संजय राठोड, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार.
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्रम, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, आण्णा बनसोडे.