---Advertisement---

Maharashtra CM : देवेंद्र पर्वाला सुरुवात, घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

---Advertisement---

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्ग्ज उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेण्यापूर्वी बाळासाहेब आणि आनंद दिघेंचं स्मरण केलं. यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

मुंबईच्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्ग्ज नेते उपस्थित होते.

मंत्रिमंडळ विस्तार
आता येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment