---Advertisement---

शिवसेनेतील ‘हे’ दोन मोठे नेते मंत्रिपदापासून वंचित ? एकनाथ शिंदेंनी भेट नाकारली

---Advertisement---

महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याआधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तारआणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत.

भाजपमधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत. तर शिवसेनेचे इच्छुक आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे.

शिवसेनेच्या यादीत यंदा नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. अकार्यक्षम आमदारांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

दरम्यान, दिपक केसरकर, तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. या दोघांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी सूत्रांची माहीती आहे. काल पाच तास थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना निराश होऊन परतावे लागले. याआधी दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी असल्याचे कारण सांगून भेट नाकारण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment