---Advertisement---

Maharashtra Politics News : उबाठा गटातील बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत !

---Advertisement---

नव्या वर्षाच्या पहिल्याच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळतेय. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल घेतली नाही, यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार नाराज झाले. हे  माजी आमदार दुसरे कोणी नसून राजन साळवी आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, राजन साळवी येत्या महिन्याभरात मोठा निर्णय घेऊ शकतात. राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की, साळवी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात.

याशिवाय, साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई होण्याची शक्यता पुन्हा वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या चर्चांबाबत राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली असून, “या बातम्यांमध्ये तथ्य नाही,” असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र, त्यांनी “योग्य वेळ आल्यावर बोलेन,” असे सांगितले. त्यामुळे संभाव्य निर्णयाबाबत उत्सुकता वाढवली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment