---Advertisement---

उद्धव ठाकरेंचा पाय खोलात; त्यांच्याशी संबंधित ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

अलिबाग : उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे मुरुड तालुक्यात एक जमीन आहे. या जमीन व्यवहार प्रकरणी झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोर्लई येथे ९ एकर जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या जागेतील कथित १९ बंगल्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब लपून ठेवली असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करत होते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे, यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्री असताना दबाव आणल आणि अधिकार्‍यांनी कागदपत्रात छेडछाड केल्याचे सोमय्या यांचा आरोप आहे. त्यानुसार अखेर गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी मुरुड पंचायत समितीच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात फसवणूक, संगनमत, १९ बंगलो चे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment