---Advertisement---

Journalist Day 2025 : ‘तरुण भारत’चे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी दर्पणकार पुरस्काराने सन्मानित

---Advertisement---

जळगाव : पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील १० पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडला. यावेळी तरुण भारतचे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांच्यासह विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांचा सन्मान पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,  जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, आणि संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे उपस्थित होते.

---Advertisement---

ग्रामीण पत्रकारांचा प्रवास खडतर – मंत्री पाटील 

ग्रामीण भागातील पत्रकारांचे खडतर जीवन उलगडताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. त्यांनी पत्रकारांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून, चांगल्या सुविधा व धोरणांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

पुरस्कारप्राप्त पत्रकारांची यादी

प्रिंट मीडिया : चंद्रशेखर जोशी (तरुण भारत, निवासी संपादक)
सुनील पाटील (लोकमत)
सुधाकर जाधव (दिव्यमराठी)
चेतन साखरे (देशदूत)

इलेक्ट्रॉनिक मीडिया:

किशोर पाटील (साम TV)
संजय महाजन (साम TV)
विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत)

डिजिटल मीडिया:

नरेंद्र पाटील (पुढारी डिजिटल)
निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल)

छायाचित्रकार : सचिन पाटील (लोकमत)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागराज पाटील आणि संतोष नवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---