---Advertisement---

‘किती पैसे खाणार ? घे खा !’, नागरिकांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला शिकवला पैसे उधळून धडा, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

गुजरातमधील एका सरकारी कार्यालयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नागरिकांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला भर कार्यालयात पैसे उधळून चांगलाच धडा शिकवल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये संतप्त नागरिक अधिकाऱ्यावर घाण पाणीपुरवठ्याचा आरोप करत आहेत. “बिस्मिल्ला सोसायटीत घाण पाणी येतेय,” अशी तक्रार करत नागरिकांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा वर्षाव केला. एवढेच नाही, तर “किती पैसे खाणार? घे खा!” असे म्हणत अधिकाऱ्यावर नोटांचा वर्षाव केला. अधिकारी हात जोडून शांत बसलेला दिसत आहे, तर दुसरीकडे लोकांचा संताप उफाळून आला आहे.

https://twitter.com/i/status/1878452366527385717

‘कलम की चोट’ नावाच्या एक्स (माजी ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “घे खा! किती हरामची कमाई खाणार?” असे कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सकडून संताप व्यक्त होत आहे. “लाचखोर अधिकाऱ्यांना असेच उघडे पाडले पाहिजे,” असे एका युजरने म्हटले आहे.

 

 नेमके ठिकाण अज्ञात

हा व्हिडिओ गुजरातमधील नेमक्या कोणत्या भागातील आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ‘तरुण भारतने’ या व्हिडिओची पुष्टी केलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ अनेकांनी शेअर करत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन चांगले असूनही लाच घेण्याचा मोह सुटत नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. या घटनेमुळे सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

 टिप : लाचखोरी ही समाजाच्या विकासाला मारक ठरत आहे. अशा घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment