---Advertisement---

Taloda Murder Case : ‘त्या’ खुनाचा काही तासांत उलगडा; पैसे ठरले कारण

---Advertisement---

Taloda Murder Case : तळोदा तालुक्यातील नळगव्हाण शिवारात नदीकिनारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेदरम्यान एका परिचारिकेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास करून काही तासांतच या घटनेचा उलगडा केला. पती राकेश वळवी याने वादातून पत्नी वंदना वळवी ( ३२) हिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंदना वळवी या बुधावल प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रविवार, १२ जानेवारी रोजी वंदनाने आपल्या मुलाला आईकडे सोडून पती राकेशसोबत शेतात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राकेश सतत वंदनाकडून पैशांची मागणी करत होता. पैसे देण्यास वंदनाने नकार दिल्याने संतापलेल्या राकेशने कुदळीने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. खुनानंतर तिचा मृतदेह नदीकिनारी फेकून, वंदना अचानक गायब झाल्याचा बनाव त्याने रचला.

घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास करण्यात आला. वंदनाच्या मृतदेहाच्या तपासादरम्यान पोलिसांना तिच्या पतीवर संशय आला. चौकशीत राकेशने खुनाची कबुली दिली.

या प्रकरणी वंदनाच्या भावाने तळोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, राकेश वळवीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment