---Advertisement---

जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई; मांजाच्या पाच चक्री जप्त

---Advertisement---

जळगाव । नायलॉन मांजामुळे राज्यात काही भागात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून काही प्रकरणात तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून मांजा विक्रेत्या विरोधात कारवाई सुरू आहे. अशातच जळगाव शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई बेंडाळे चौक ते पांझरापोळ चौक दरम्यान केली. जिथे हे दोघे चोरून नायलॉन मांजा विक्री करत होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हे दोन्ही युवक लपून नायलॉन मांजा विक्री करत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोनोकाइट नायलॉन मांजाच्या पाच चक्री जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी दर्शन संजय शिंपी आणि एका अल्पवयीन बालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 125, 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 5, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment