---Advertisement---

Pune Crime News : डॉक्टर तरुणीने क्लिनिकमध्येच संपवलं आयुष्य, समोर आलं धक्कादायक कारण

---Advertisement---

पुणे : लग्न झालेलं असतानाही आपण अविवाहित असल्याचं भासवून एका तरुणाने डॉक्टर युवतीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्याकडून वेळोवेळी तब्बल 10 लाख रुपये उकळले. अखेर, आपण विवाहित असल्याचं आणि पत्नी गर्भवती असल्याचं सांगितल्यानंतर डॉक्टर युवतीला जबर मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून ती सावरू शकली नाही आणि स्वतःच्याच क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

ही धक्कादायक घटना पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात, पीएमटी कॉलनीत 7 जानेवारी रोजी घडली. आत्महत्या केलेल्या डॉक्टर युवतीचे नाव पल्लवी पोपट फडतरे (वय 25) असून, तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कुलदीप आदिनाथ सावंत (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

लग्नासाठी नोंदणी, प्रेमाचं नाटक आणि फसवणूक

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली. त्यानंतर त्याने पल्लवीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. पल्लवीच्या वडिलांनी त्याचे वागणे पाहून त्याला नकार कळवला होता. मात्र, आरोपीने थेट पल्लवीशी संपर्क साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

10 लाखांची फसवणूक आणि धक्कादायक सत्य

आरोपीने वेगवेगळी कारणं सांगून पल्लवीकडून दहा लाख रुपये घेतले. अखेर पल्लवीने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने आपण विवाहित असल्याचं आणि पत्नी गर्भवती असल्याचं सांगितलं. यामुळे पल्लवीला जबर मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून ती सावरू शकली नाही आणि स्वतःच्याच क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं.

पल्लवीच्या कुटुंबाचा आक्रोश

पल्लवीच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तिच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून आरोपी कुलदीप सावंतविरुद्ध फसवणुकीचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment