---Advertisement---
पुणे : MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दरम्यान, एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार आहे. हातात मंडळाने मोठी भरती काढली असून MPSC मार्फत राज्य शासनाच्या पाच विभागाची भरती होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केली आहे.
MPSC मार्फत राज्य शासनाच्या तब्बल पाच विभागातील ६७३ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. MPSC आयोगाने नोटिस काढली असून याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.
या विभागात भरती
सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा,वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग.
कधीपर्यंत करता येणार अर्ज
परीक्षेसाठी २२ मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पूर्व परीक्षेतील निकालात गुणवत्तेच्या आधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. ही परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होणार असल्याचे आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कुठे किती पदे
सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे, अन्न व नागरी विभागात ३९ पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदे.
---Advertisement---