---Advertisement---

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? 

---Advertisement---

नंदुरबार : अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची मते न घेता अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. याची दखल घेत, पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली असून, त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचाराऐवजी वसावे यांनी अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराने पक्ष नेतृत्व नाराज झाले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती संपर्कप्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!

संपर्कप्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, वसावे यांच्या विरोधातील तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली. मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी वसावे यांच्या पक्षविरोधी भूमिकेची माहिती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली होती. महायुतीने विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली होती, परंतु वसावे यांच्या अशा कृतीमुळे पक्षाच्या नीतिनियमांचे उल्लंघन झाले.

हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!

शिवसेना शिंदे गटाने स्पष्ट केले आहे की, पक्षविरोधी कामगिरी करणाऱ्या कोणालाही पक्षात स्थान मिळणार नाही. या निर्णयामुळे पक्षाच्या शिस्तीचे महत्त्व आणि पक्षविरोधी कारवायांविरोधातील कठोर दृष्टीकोण स्पष्ट झाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment