---Advertisement---

Illegal Foreign Nationals : बांगलादेशानंतर आता ‘या’ देशातील नागरिकांचा पुण्यात अवैध वास्तव, पोलीस तपासात उघड

---Advertisement---

पुणे : अवैधपणे घुसखोरी करून भारतात राहणाऱ्या बांगलादेशींवर पोलिस प्रशासनाने तीव्र कारवाई सुरु केली आहे. अशातच पुण्यात येमेन देशातील सात जण अवैधपणे वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे शहर पोलिस दलातील विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) या नागरिकांची हकालपट्टी करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील परदेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विशेष शाखेने एनआयबीएम परिसरातील एका सोसायटीत तपासणी सुरू केली.

या तपासणीमध्ये दोन महिलांसह सात येमेनी नागरिकांची व्हिसाची मुदत संपल्याचे आढळून आले. या नागरिकांना ताब्यात घेतले आणि चौकशी करण्यात आली.

हेही वाचा : उधार बिअर मागणे पडले महागात; दुकान मालकाने चौघांसह ग्राहकाला बेदम चोपले!

पोलिसांकडून या नागरिकांना “लिव्ह इंडिया नोटीस” देण्यात आली असून, त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परकीय नागरिक नोंदणी विभागाने या कारवाईची माहिती दिली आहे.

पोलिस दलाच्या या कारवाईमुळे शहरात बेकायदा परदेशी नागरिकांच्या विरोधात एक ठोस संदेश जात आहे, आणि त्यामुळे अन्य बेकायदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment