---Advertisement---

Budget 2025 : महिला सन्मान आणि सशक्तीकरणावर विशेष भर, पीएम मोदींनी सांगितले बजेटची त्रिसूत्री

---Advertisement---

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत या अधिवेशनाच्या महत्त्वपूर्ण अजेंड्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होणार असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

महिलांच्या सन्मानाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “या अधिवेशनात असे अनेक निर्णय घेतले जातील, ज्यामुळे महिलांना सन्मानाचे जीवन मिळेल. महिलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे.”

देवी लक्ष्मीच्या स्मरणाने भाषणाची सुरुवात

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात देवी लक्ष्मीच्या स्मरणाने केली. ते म्हणाले, “ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे. कल्याणासोबतच माता लक्ष्मी समृद्धी आणि बुद्धी देते. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीयांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहो, हीच प्रार्थना.”

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म – विकासाच्या दिशेने पावले

पंतप्रधान मोदींनी विकासाच्या प्रक्रियेवर भर देताना म्हटले, “जेव्हा विकासाचा वेग वाढवायचा असतो, तेव्हा सुधारणांवर अधिकाधिक भर दिला जातो. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला एकत्र काम करावे लागते. या दोन्ही टप्प्यांनंतर लोकसहभागातून परिवर्तन घडताना दिसत आहे. हा प्रवास देशाच्या भविष्याला बळकट करणारा असेल.”

उद्या अर्थसंकल्प सादर करणार निर्मला सीतारामन

उद्या, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या अडीच ते तीन दशकांत पहिल्यांदाच एका अर्थमंत्र्यांनी सलग आठवे अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. हा अर्थसंकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

देशाच्या आर्थिक धोरणांसाठी निर्णायक असणाऱ्या या अधिवेशनात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment