---Advertisement---

दुर्दैवी! ट्रकला धडकताच बसला भीषण आग, ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

---Advertisement---

Mexico Accident : दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या बस आणि ट्रक भीषण अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ३८ प्रवासी, तर दोन बस चालक आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर बसला आग लागल्याने ती संपूर्ण जळून खाक झाली आहे.

टबास्को राज्यातील कोमलकाल्को परिसरात हा अपघात झाला. बस कॅनकुनहून टबास्कोकडे जात असताना अचानक एका ट्रकला धडकली. या जोरदार धडकेनंतर बसने पेट घेतला आणि संपूर्ण जळून खाक झाली. बसमध्ये एकूण ४८ प्रवासी होते, यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोमलकाल्कोचे महापौर ओव्हिडिओ पेराल्टा यांनी सांगितले की, “आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून आम्ही आवश्यक ती सर्व मदत पुरवत आहोत.”

हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ

टबास्को राज्य सरकारने यासंबंधी माहिती देताना सांगितले की, सध्या बचावकार्य सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. टबास्को सरकारचे सचिव रामिरो लोपेझ यांनी स्पष्ट केले की, “अधिकृत तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.”

अपघातग्रस्त बस टूर्स अकोस्टा या बस ऑपरेटर कंपनीची होती. कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बस वेग मर्यादेत धावत होती. अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल.

सुरुवातीच्या तपासानुसार, या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बसला आग कशी लागली, चालकांचा निष्काळजीपणा होता का, ट्रकच्या स्थितीबद्दल काही तक्रारी होत्या का, यासंबंधी तपास केला जात आहे.

शासनाकडून मदतीची घोषणा

मेक्सिको सरकारने मृतांच्या कुटुंबीयांसाठी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी प्रवाशांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

ही दुर्घटना मेक्सिकोसाठी मोठा धक्का आहे आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कठोर वाहतूक नियम लागू करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारी यंत्रणांकडून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment