---Advertisement---

हृदयद्रावक! आईनेच घोटला दोन चिमुकल्यांचा गळा अन् पतीवर केला वार; स्वतःलाही पेटवून घेण्याचा प्रयत्न

---Advertisement---

पुणे : घरगुती वादातून एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून खून केला तसेच झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने हल्ला करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे शनिवारी पहाटे घडली. या घटनेत दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

ही घटना शनिवारी (१० फेब्रुवारी) पहाटे घडली. या घटनेत शंभू उर्फ हर्ष दुर्योधन मिंढे (३) आणि पियू (१) या दोन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा पिता दुर्योधन आबा मिंढे (३५) गंभीर जखमी असून, त्याच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत. आरोपी कोमल मिंढे (३०) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

दुर्योधन मिंढे हे आयटी क्षेत्रात कार्यरत असून, दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम होम करत होते. कोमल बीएस्सी केमिस्ट्री शिक्षण घेतलेली आहे. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात कोमलने रात्रीच्या वेळेस आपल्या मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला.

वाद झाल्यानंतर कोमल आपल्या चिमुकल्या मुलीसह बेडरूममध्ये झोपली होती. मध्यरात्री तिने प्रथम एक वर्षाच्या पियूचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आजीसमवेत झोपलेल्या तीन वर्षांच्या शंभूला उचलून बेडरूममध्ये आणले आणि त्याचाही जीव घेतला.

यानंतर कोमलने बाहेरच्या खोलीत झोपलेल्या पती दुर्योधन मिंढे यांच्यावर कोयत्याने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुर्योधन यांनी जोरात आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले.

दुर्योधन यांनी प्रतिकार करत आरडाओरड केल्याने कोमल घाबरली आणि धावत जाऊन आपल्या बेडरूममध्ये शिरली. तिने तिथे स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला. तिने चाकूने हाताच्या नस कापण्याचा प्रयत्न केला, तसेच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील लोकांनी वेळीच दरवाजा तोडून तिला वाचवले आणि पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी कोमल हिला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणावरून घडला, हे तपासाअंती स्पष्ट होईल. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment