---Advertisement---

Viral Video : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली

---Advertisement---

Viral Video : पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिक्रमणामुळे दिवसरात्र आणि ऋतूंचे बदल होत असले, तरी प्रत्यक्षात आपल्याला तिची गती जाणवत नाही. मात्र, एका अविश्वसनीय व्हिडीओमुळे पृथ्वीच्या या हालचाली नव्या दृष्टीकोनातून पाहायला मिळत आहेत. Indian Institute of Astrophysics, Bengaluru येथील इंजिनिअर दोरजे अंगचुक यांनी हा अद्भुत व्हिडीओ चित्रीत केला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ पाहताना आभाळ स्थिर दिसत आहे, तर पर्वत, घरं आणि मैदानं या स्थिर आकाशाभोवती फिरताना जाणवत आहेत. अवघ्या 1.11 मिनिटांचा हा व्हिडीओ पाहताना क्षणभर डोकं चक्रावून जाईल, असं दृश्य तयार होतं. विशेष म्हणजे, कॅमेरा एका ठिकाणी स्थिर ठेवून पृथ्वीच्या गतीचा प्रभाव अचूकपणे दाखवण्याचा प्रयोग या व्हिडीओतून करण्यात आला आहे.

हेही वाचा : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

हा व्हिडीओ लडाखमधील हानले गावात शूट करण्यात आला आहे. हानले हे अंतराळप्रेमी आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी स्वर्ग मानले जाते. कारण येथे मानवी वस्ती जवळपास नाही, परिणामी प्रकाशप्रदूषणही अत्यल्प आहे. त्यामुळे इथल्या आकाशात असंख्य तारे चमकत असल्याचं अद्भुत दृश्य पाहता येतं.

हेही वाचा : वीज बिल कमी करण्याच्या बदल्यात पत्नीची मागणी? शेतकऱ्याचा जेईवर गंभीर आरोप!

हानलेमध्ये असलेल्या जगातील सर्वात उंचीवरील ऑब्जर्वेटरीमुळे (Indian Astronomical Observatory) अनेक अंतराळविषयक संकल्पना येथे स्पष्ट होतात. त्यामुळे या भागात पृथ्वीच्या गतीसंदर्भात विविध अभ्यास आणि निरीक्षणं केली जातात.

पृथ्वी परिभ्रमण आणि परिक्रमण करत असली तरी ती आपल्या दैनंदिन जगण्यात जाणवत नाही. मात्र, या प्रकारच्या व्हिडीओमुळे आपण नव्या दृष्टीकोनातून पृथ्वीच्या गतीचा अनुभव घेऊ शकतो. टाइम-लॅप्स तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे पृथ्वीची गती ठळकपणे दिसून येते.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक अद्भुत नमुना म्हणून गौरवले आहे. पृथ्वीच्या गतीविषयी नव्या पद्धतीने विचार करायला लावणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment