---Advertisement---

Delhi New Chief Minister : दिल्लीत कधी होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? समोर आली मोठी अपडेट

---Advertisement---

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम आदमी पार्टीला जोरदार धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला. या निकालामुळे दिल्लीत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सरकारला जोरदार धक्का बसला आहे.

भाजपच्या या अभूतपूर्व विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे काटेकोर नियोजन असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने चालवलेल्या प्रभावी प्रचार मोहिमेचा थेट फायदा पक्षाला मिळाला आणि निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकावला.

हेही वाचा : मधुचंद्राची रात्र; नववधूनं केलं असं काही की नवऱ्यावर आली रडण्याची वेळ

शपथविधीच्या तयारीला वेग

भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीकडे लागले आहे. संभाव्य तारखा 19 किंवा 20 फेब्रुवारी असल्याची चर्चा आहे, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळा भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे.

नव्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या राजकीय वाटचालीत कोणते बदल होतील, भाजपची आगामी रणनीती काय असेल आणि ‘आप’ पक्ष या पराभवानंतर कशा प्रकारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : आरबीआय’ने घातली ‘या’ बँकेवर बंदी, आता कोणताही ग्राहक काढू शकणार नाहीत ‘पैसे’

27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन

भाजपच्या या विजयामुळे तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत पक्षाचे पुनरागमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म नियोजन आणि प्रभावी प्रचार मोहिमेमुळे हा विजय साध्य झाला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी ‘हे’ नावं चर्चेत

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत तयारी सुरू असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवाराची निवड केली जाईल. मुख्यमंत्रीपदासाठी परवेश वर्मा, कैलास गहलोत, विजेंद्र गुप्ता, कपिल मिश्रा, सतीष उपाध्याय, आशिष सूद आणि रेखा गुप्ता हे चर्चेत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment