---Advertisement---

दिल्ली-एनसीआरसह ‘या’ राज्यांना भूकंपाचे धक्के, पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

---Advertisement---

नवी दिल्ली | १७ फेब्रुवारी : दिल्ली-एनसीआरमध्ये आज पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर बिहार, ओडिशा आणि सिक्कीममध्येही भूकंपाचे हादरे बसले. एकाच दिवशी चार राज्यांत भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सुदैवाने, या भूकंपांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटे ५:३६ वाजता ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे केंद्र नवी दिल्ली होते, जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर हा धक्का बसला. भूकंपामुळे अनेक इमारतींमध्ये कंपन जाणवले, घरातील फर्निचर हलू लागले, आणि नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता जाणवली.

हेही वाचा : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख, एकमेकांची पसंतीही झाली, पण… तरूणीसोबत भयंकर प्रकार

दिल्ली-एनसीआरनंतर बिहारमध्ये सकाळी ८:०२ वाजता ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे केंद्र सिवान येथे होते. ओडिशातील पुरी येथे ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर सिक्कीममध्येही भूकंपाचे धक्के बसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : शेंदुर्णीत मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ, शेतकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

दरम्यान, या भूकंपांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना शांत, सुरक्षित आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.

भूकंपामुळे घाबरू नका, सावधगिरी बाळगा

तज्ज्ञांच्या मते, सतत येणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. जर भूकंप जाणवला, तर सुरक्षित ठिकाणी जावे, मजबूत टेबलखाली आसरा घ्यावा आणि इमारतींपासून दूर राहावे. प्रशासन नागरिकांना योग्य ती मदत करण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment