महाशिवरात्री 2025 या पवित्र दिवशी ग्रहयोग आणि राशींवर होणारा प्रभाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी परीघ योग आणि शिवयोग तयार होत आहेत, त्यामुळे काही राशींना प्रेमप्रसंगी यश मिळेल, तर काहींना संयम राखण्याचा सल्ला दिला गेला आहे. चला जाणून घेऊ या तुमच्या राशीचे संपूर्ण प्रेम राशीभविष्य.
मेष (Aries)
महाशिवरात्रीचा दिवस विवाहितांसाठी अत्यंत शुभ राहील. जोडीदारासोबत घालवलेला वेळ तुम्हाला अधिक जवळ आणेल. प्रेमसंबंधातील लोकांसाठी हा दिवस सामान्य असेल, मात्र, एखादी खास भेट किंवा संवाद यामुळे नाते अधिक घट्ट होईल.
वृषभ (Taurus)
रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींना या दिवशी काहीसा कंटाळवाणा अनुभव येऊ शकतो. विवाहित लोक जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा विचार करू शकतात, पण सोलमेटला भेटण्याची शक्यता कमी आहे.
मिथुन (Gemini)
अविवाहितांसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. विवाहित आणि नवीन नात्यातील लोकांच्या आयुष्यातील तणाव दूर होण्याची शक्यता आहे. एकत्र मंदिरात जाऊन पूजा करणे शुभ ठरेल.
कर्क (Cancer)
नात्यात अडचणी येऊ शकतात. कोणत्याही कारणाने तुमचा बाहेर जाण्याचा प्लॅन रद्द होऊ शकतो. प्रेमसंबंधातील तणाव वाढू शकतो. मात्र, मित्राच्या मदतीने नवी प्रेमकथा सुरू होऊ शकते.
सिंह (Leo)
या राशीतील लोकांसाठी हा दिवस काहीसा कठीण जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. बाहेर जाण्याचे किंवा सहलीचे नियोजन रद्द होऊ शकते. अविवाहित लोकांना प्रेमात यश मिळण्याची शक्यता नाही.
कन्या (Virgo)
जे लोक आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक नाहीत, त्यांच्यासाठी हा दिवस आव्हानात्मक ठरेल. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन संबंध तुटण्याची शक्यता आहे. मात्र, अविवाहितांसाठी हा दिवस शुभ राहील आणि खरे प्रेम मिळण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री काहीशी तणावपूर्ण जाईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना प्रेम मिळण्याची शक्यता कमी आहे. शांत राहून कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा.
वृश्चिक (Scorpio)
विवाहितांना आणि प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींना हा दिवस शुभ ठरेल. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी डेटवर जाण्याचा विचार करू शकता. अविवाहितांसाठीही प्रेमसंबंध प्रबळ होतील.
धनु (Sagittarius)
अविवाहितांसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील. लग्नाच्या प्रस्तावाची शक्यता आहे. विवाहित आणि रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी दिवस आनंददायी असेल. मंदिरात जाऊन प्रार्थना केल्यास शुभ फळ मिळेल.
मकर (Capricorn)
गेल्या काही दिवसांपासून जोडीदारासोबत सुरू असलेले वाद मिटू शकतात. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. अविवाहितांना प्रेमात यश मिळू शकते.
कुंभ (Aquarius)
या राशीतील लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस फारसा अनुकूल नाही. नुकतेच ठरलेले लग्न मोडण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठीही दिवस संमिश्र असेल. अविवाहितांनी खऱ्या प्रेमासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
मीन (Pisces)
नवीन नातेसंबंधांमध्ये तणाव जाणवू शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवस जरा शांततेत घालवा आणि मंदिरात जाऊन महादेवाचा आशीर्वाद घ्या.