---Advertisement---

Crime News : फलटणसाठी निघाली अन् घात झाला, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

---Advertisement---

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेवरून वादळ उठलेले असताना, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर थेट उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (26 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास घडली.

पीडित तरुणी पुण्यातून फलटणला जाण्यासाठी काल पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली होती. पहाटेच्या वेळी एसटी स्टँड परिसर तुलनेने कमी वर्दळीचा असतो. याच संधीचा फायदा घेत आरोपीने उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये तरुणीवर अत्याचार केला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या घटनेमुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात पोलिस पुढे काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment