---Advertisement---

दुचाकीवरून गांजाची तस्करी; कासोदा पोलिसांनी जप्त केला २.८१ लाखांचा मुद्देमाल

---Advertisement---

कासोदा : दुचाकीवरून गांजाची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला कासोदा पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल २ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

कासोदा पोलिसांना त्यांच्या हद्दीत आणि परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून सापळा रचला होता. अखेर, २५ फेब्रुवारीच्या पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान, एरंडोलहून कासोदा गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम दुचाकीवरून गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचून संशयिताच्या एमएच १९ डीवाय २७१७ या पल्सर मोटरसायकलचा पाठलाग करून त्याला अडवले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीची तपासणी केली असता, त्यात खाकी रंगाचे चौकोनी आकाराचे पुडे आढळले. त्यांची पाहणी केली असता ते गांजाचे असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तातडीने संशयिताला ताब्यात घेतले. त्याचे नाव अजय रवींद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) असे आहे. त्याच्याकडून १९ किलो गांजा (किंमत १.९ लाख रुपये) आणि मोटरसायकल (किंमत ९० हजार रुपये) असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे. गांजा तस्करीच्या या साखळीचा अधिक तपास सुरू असून, यामागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment